Ajit Pawar : शिवसेनेतील बंडावेळी शिंदेंनी वापरलेली स्क्रिप्ट आता अजित पवार गटाच्या हाती; सर्वकाही 'सेम टू सेम'

Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar and Eknath Shinde
Updated on

मुंबई - आम्ही म्हणजेच पक्ष आहोत, हे वाक्य साधारण वर्षभरापूर्वी सर्वांनीच ऐकलं आहे. निमित्त होतं, एकनाथ शिंदे यांचे बंड. शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बंडात सामील झालेले सर्वजण आम्हीच खरी शिवसेना आहोत म्हणत होते. तसेच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. आता याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीतील बंडानंतर होताना दिसत आहे.

Ajit Pawar and Eknath Shinde
Chh. Sambhajinagar : मला गणेशभाऊ का म्हटला नाही म्हणत, दोन ‘आमदारां’ची लॉज व्यवस्थापकाला मारहाण

जी विधाने शिंदे गटातील नेत्यांनी फुटीनंतर केले होते, तीच विधाने अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल करत आहेत. अजित पवार म्हणाले की, आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षवाढीसाठी आम्ही निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar NCP : सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का? अजित पवार भडकले

आम्हाला कोणाच्या विरोधात जायचं नाही. कुणाची हकालपट्टी करायची नाही. आमचं बंड आहे की, आम्ही पक्ष आहोत, लवकरच कळेल. यावेळी विधीमंडळ नेतेपदी असलेले जयंत पाटील यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. शिवाय तसेच प्रतोदबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. असाच घटनाक्रम शिंदेंच्या बंडावेळी होता.

तसेच शिवसेनेतील बंडावेळी सुरुवातीला शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी काहीही बोलणं टाळलं गेलं होतं. आता राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या नेत्यांकडून शऱद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी असाच आदार राखण्यात येत आहे.

शिवसेनेतील बंडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर सातत्याने एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडून विश्वास दाखविण्यात येत होता. तसेच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विचारासाठी आम्ही भाजपसोबत गेल्याचं बोललं गेलं होतं. आता देखील राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाकडून मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविण्यात येत आहे. तसेच मोदींमुळे रखडलेले कामं मार्गी लागतील, असं अजित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.