Chhagan Bhujbal: मला खासदार व्हायची इच्छा आहे, म्हणूनच...; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal News: भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मला खासदार व्हायची इच्छा आजही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

नवी दिल्ली- राज्यसभेवर जाण्यासाठी संधी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मला खासदार व्हायची इच्छा आजही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. माध्यमांशी ते बोलत होते.

मी नाराज नाही. माध्यमांमध्ये उगाच चर्चा केली जाते. मला खासदार व्हायची इच्छा आहेच. म्हणूनच मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट फायनल केलं होतं. मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी कामाला लागलो होतो. पण, एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आलं नाही. हा अपमान नको म्हणून मी माघार घेतली, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

Chhagan Bhujbal
Sunetra Pawar: पार्थ, छगन भुजबळ नाराज? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्पष्ट सांगितलं

बारा पंधरा दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमेदवार जाहीर झाला. त्याचे परिणाम आपल्याला दिसले. पक्ष म्हटला की आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काहीवेळा थांबावं लागतं. आपल्याला वाटतं असं व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. नशिबाचा काही भाग असतो, त्यामुळे काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, असं ते म्हणाले.

४०० पारचा नारा दिला असल्याने महायुतीला फटका बसला. दलित, आदिवाशी युतीपासून दूर गेले. मुस्लीम समाज तर आधीपासूनच दूर गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीका बरोबर आहे, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ पक्षात नाराज? अजितदादांची साथ सोडून पवारांकडे परतणार?

भिडे वाड्याविषयी भाष्य

भिडे वाड्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढतो, पण त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. दोन अडीच महिने आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याठिकाणी राहत होते. याठिकाणी बालसंगोपन केंद्र आहे, विहीर आहे. याठिकाणी पाचशे लोक देखील बसू शकत नाही. त्यामुळे जवळची जागा मोकळी करावी आणि तिनशे मीटरवर असलेले सावित्रीबाईंचे स्मारक जोडण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण यात काही प्रगती होत नाही, असं भुजबळ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.