NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते तथा नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या पहिल्याच बैठकीत शरद पवार गटावर हल्ला चढवला आहे. सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. त्याशिवाय पक्ष कसा वाढणार? आम्ही सध्या जे करतोय ते नियमात बसूनच करतो,असं म्हणून त्यांनी शरद पवार गटावर काही आक्षेप घेतले. याला आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
जयंत पाटील म्हणाले की, इथं कोणालाही बांधून आणलेलं नाही. कार्यकर्ते स्वत:च्या खिशाला कात्री लावून पवार साहेबांच्या प्रेमासाठी कार्यकर्ते आलेले आहे. संकट कितीही आली तरी पवार साहेबांनी विचलीत न होता, बाजी पलटवली आहे. १९९९ ला आपला प्रवास सुरू झाला. हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण कोणीही पवारसाहेबांपासून बाजुला गेले नाही.
मुंबई शहराचा अध्यक्षा नेमला नाही. नवाब मलिक हेच अध्यक्ष होते. त्यामुळे आपण अध्यक्ष नेमला नाही. मुंबईच्या नियुक्त्या राष्ट्रीय पातळीवर होतात. मला प्रदेशाध्यक्षपदासाठी पाच वर्षे झाली. त्यामुळे मी सुट्टी मागितली होती. आज आमच्याबरोबर अनेक लोक होती. अनेकांना पवार साहेबांनी संधी दिली. पण आता विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत.
दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून पुण्यात त्यांचं आगमन झालं. त्यावेळी भुजबळांच्या डोक्यावर फुले पगडी पवार साहेबांनी ठेवली. त्यावेळी पगडी आडवी आली नाही. पण त्या पगडीच्या खालून महात्मा फुलेंचा विचार तुमच्या डोक्यातून निघून गेला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
तसेच फुलेंचा अपमान ज्यांनी केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला. याला काही लॉजिक आहे का? शिवतिर्थावर २०१९ ला उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात पहिली शपथ घेताना बडवे आडवे आले नाही का? तेव्हा बडवे आडवे आले नाही का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.