मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली. पक्षाच्या नवनिर्वाचित उमेदवारांची आज अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..पक्षासंबंधीचे विधिमंडळातील निर्णयाचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव मांडण्यात आला, त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.विधिमंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व विजयी उमेदवारांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच पक्षाचे सर्व आमदार आणि अन्य उमेदवार यावेळी उपस्थित होते..विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ५९ जागा लढवत तब्बल ४१ जागांवर यश संपादन केले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतील भाजप-शिवसेना या घटक पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याच दृष्टीने रविवारी पक्षाकडून सर्व विजयी आणि पराभूत उमेदवारांना तातडीने मुंबईत बोलावले होते. या बैठकीत आगामी महायुती सरकारमध्ये महत्त्वाची पदे घेण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे समजते..एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकारमुंबई - विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला..शिवसेनेच्या विजयी उमेदवारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला..या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकारिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देत शिंदे यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेतला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५७ उमेदवार निवडून आले आहेत.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.