NCP Crisis : अजित पवारांकडून आमदारांना निधी मिळताच शरद पवारांच्या गटात खळबळ? नव्या फुटीची चर्चा सुरू

Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी शिंद-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि यासोबत शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

शरद पवारांनी पक्षात पडलेल्या फुटीनंतर लगेच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा करत पक्ष उभारणीला नव्याने सुरूवात केली. मात्र यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंर शरद पवार गटात उरलेल्या आमदारांमध्ये देखील दोन गट पडल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही आमदारांना सत्तेत जाण्याचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Mumbai Water Lake Level : मुंबईकरांना दिलासा! 'इतकी' भरली शहराला पाणी पुरवणारी सात धरणं

आगामी निवडणूकीत मतदारसंघ वाचवायचे असतील तसेच पुन्हा निवडून यायचे असेल तर निधीची आवश्यकता आहे. यासाठी सत्तेत जाणे गरजेचं आहे असं मत या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने साम टीव्हीने दिली आहे. जर राष्ट्रवादीचे आणखी आमदार सत्तेत सहभागी झाले तर तो शरद पवार यांना धक्का ठरणार आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Pune Crime News : पोलीस दलात खळबळ! पुण्यात 'एसीपी'कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

अजित पवारांकडून आमदारांना भरघोस निधी

दुसरीकडे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये अजित पवार यांना अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी सर्व आमदारांना २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी देखील भरघोस निधी मंजूर केला आहे.

विकासकामाच्या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी तब्बल १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.