Ajit Pawar: घरवापसी की जागा वाढवून मिळण्यासाठी दबाव? 'या' तीन घडामोडींमुळे अजित पवारांवर महायुतीत शंकेची सुई

NCP Jansanman Yatra: माजी मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी अजित पवार यांच्या गाडीमध्ये बसून प्रवास केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीमध्ये स्थान मिळणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे. आठ महिने शांत राहिल्यानंतर अजित पवारांनी मलिकांना सार्वजनिकरित्या सोबत घेऊन एकप्रकारे मेसेजच दिला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

Ajit Pawar Latest News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीची साथ सोडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या काही आठवड्यांपासून घडणाऱ्या घडामोडींकडे बघितलं तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी शिजतंय, असं दिसून येतंय.

१. माजी मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी अजित पवार यांच्या गाडीमध्ये बसून प्रवास केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीमध्ये स्थान मिळणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे. आठ महिने शांत राहिल्यानंतर अजित पवारांनी मलिकांना सार्वजनिकरित्या सोबत घेऊन एकप्रकारे मेसेजच दिला आहे.

२. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपयश आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट अजित पवारांवर आरोप करत त्यांना दोषी ठरवलं. त्यामुळे अजित पवारांचा पक्ष बॅकफुटवर गेला. मात्र मागच्या पंधरा दिवसांपासून पक्षामध्ये मोठे बदल झाल्याचं दिसतंय. अगदी जॅकेटपासून ते जनसन्मान यात्रेपर्यंत.. अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सन्मानाचा वाटा मिळावा, यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय.

Ajit Pawar
Sharad Pawar: लंकेंच्या विजयात आमचाही वाटा; पवारांच्या जागेवर ठाकरेंचा दावा!

३. मागच्या पंधरा दिवसांपासून अजित पवारांनी एकप्रकारे प्रचारदौरे सुरु केले आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवार देऊन चूक केल्याची कबुली अजित पवारांनी दिली. पुढे जात त्यांनी रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार असल्याचंही म्हटलं. हे कमी की काय पुण्यात कथित भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते.

या सगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख म्हणाले की, अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणे निश्चित आहे. भाजपकडून त्यांना स्वतंत्र निवडणुका लढवण्यास सांगितलं जाईल. शिवाय अजित पवारांचं पुन्हा शरद पवारांकडे स्वागत होणार नाही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ती शक्यता फेटाळून लावली आहे.

दुसरीकडे नवाब मलिक आणि अजित पवारांची भेट त्यांच्या मुलीच्या उमेदवारीसाठी होत असल्याचं राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितलं. मलिकांची मुलगी निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे म्हणाले की, महायुतीमध्ये आता फूट पडल्याचं दिसतंय. तसं नसतं तर अजितदादा मलिकांसोबत असं खुलेआम फिरले नसते. पक्षाचे दुसरे नेते दुनेश्वर पेठे यांनीही अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील, असं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.