मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. नुकतेच अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआर दाखल केला आहे. अनिल देखमुख यांच्या काही जवळच्या व्यक्तींविरोधात देखील तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पूर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे, असं देशमुख म्हणाले.