Chhagan Bhujbal: जरांगेंसमोर हात जोडल्यास, ओबीसींना काय न्याय मिळेल; छगन भुजबळांचे वक्तव्य

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

मुंबई- अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. आमचा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही. पण, तो इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावा. जी शरद पवारांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

मंत्री, न्यायमूर्ती जात आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर हात जोडत आहेत. मंत्री सत्तेसाठी जात आहेत, पण न्यायमूर्ती देखील जाऊन सर सर करत आहेत. मग ओबीसींना काय न्याय मिळेल, ते तिकडे जाऊन हात जोडत आहेत. कुणबी तपासणीसाठी 5 हजार नोंदी मिळाले नंतर अचानक 10 हजार झाले त्यानंतर 13 हजार झाले आणि आता तर साऱ्या महाराष्ट्रात ऑफिस उघडले, असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Chhagan Bhujbal
Maratha Reservation : ''500 कोटी द्या अन् माझी मालमत्ता घेऊन जा'', जरांगेंचा नामोल्लेख टाळत भुजबळ बोलले

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसींमध्ये आधीच खूप जाती आहेत. त्यामुळे अधिक वाटेकरी करु नका. जरांगे पाटलांच्या सभेसाठी नुकसान झाल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मग, ज्यांची घरे जाळण्यात आली त्यांनाही शासनाने मदत करावी. जाळपोळ करणारे तुमची माणसं नाही म्हणता मग कारवाई माघे घेण्याची मागणी कशाला करतात, असं भुजबळ म्हणाले आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. आंदोलनावेळी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. घरांवर हल्ले झाले. यावेळी पोलिस इतके हतबल कसे झाले. त्यांनी कुठेही प्रतिकार केला नाही. बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट होतो. किती पोलिस जखमी झालेत याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.

अंतरवाली इथं जरांगे ज्यावेळी उपोषणाला बसले होते, त्यावेळी पोलिस जखमी झाले, पोलिसांची बाजू पुढे आली नाही. त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर सरकारणे काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कारवाई केली. गुन्हे मागे घ्याययला लावले. अशी ट्रिटमेंट जर पोलिसांवर केली असेल तर त्याचा हा परिणाम आहे, तपास यंत्रणा पूर्णपणे फेल झाली आहे, असंही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal
Jalna News : मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ओबीसी जनजागृती साठी भेटी देणार - छगन भुजबळ

मी आज बीड आणि माजलगाव येथे घरे, ऑफिस, हॉटेल्स जाळपोळ केली त्याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. समता परिषदेचे हॉटेल्सचं नुकसान मोठं झालंय, तासभर 400-500 जणांचा जमाव नासधूस करत होता.त्यात पहारी, कुऱ्हाडी घेऊन आले होते,अक्षरशः त्या हॉटेल्सची राखरांगोळी करण्यात आली. एक दोन पोलिस होते ते काहीही करू शकले नाहीत. आम्ही फक्त सांगत होतो की आमचं शाबूत ठेवा, असं भुजबळ म्हणाले.

क्षीरसागर यांचे घर का जाळले? त्यांनी तर काहीही म्हटलं नाही. तेली आहेत म्हणून त्यांचं घर जाळलं का? या सगळ्या जाळपोळीची कठोर चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.