महात्मा फुलेंचा फोटो का नसतो? जरांगेंना महापुरुषांची नावे देखील माहिती नाहीत; भुजबळांचा निशाणा

माझा लढा मनोज जरांगेंच्या झुंडशाहीला आहे. लोकांची घरं जाळणं. सरकारला दमबाजी करणं, आरक्षण दिलं नाही तर बघून घेतो. भुजबळांना पाहून घेतो, कार्यक्रम करतो अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे
 ncp chhagan bhujbal
ncp chhagan bhujbal
Updated on

मुंबई- सगळ्यांनाच सरसकट कुणबी आरक्षण द्या अशी मागणी केली जात आहे. पण, अनेकांनी सांगितलंय की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. आम्हाला वेगळं आरक्षण द्या. ओबीसीला धक्का न लावता अशी माझी मागणी आहे. आणि सर्व पक्षातील नेत्यांची देखील तीच मागणी आहे.पण, खोट्या पद्धतीने सर्टिफिकेट देण्याचं काम सुरु आहे, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय.

जे खरे असतील त्यांच्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही. मी काही कागदपत्रं सोबत आणले होते ते मी सभागृहात दाखवले आहेत. हे आम्हाला पसंत नाही. खोटे कुणबी सर्रास व्हायला लागले आहेत. बॅकडोअर एन्ट्री सुरु आहे. त्यामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होणार आहे. कारण, खोटे लोक आत शिरल्यास त्यांना नोकरी, शिक्षण आणि राजकारणात आरक्षण मिळेल. याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात येईल, असं भुजबळ म्हणाले.

 ncp chhagan bhujbal
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ अन् पुतण्याविरोधातील याचिका ईडीकडून मागे! पुत्र पंकजविरोधातील मात्र कायम

सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, आतापर्यंत इतके मराठा समूदायाचे मुख्यमंत्री झाले. मग, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही? यावर भाष्य करताना न्यायमूर्ती म्हणाले की, त्यांची ती विवेक बुद्धी होती आणि योग्य निर्णय होता. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात यावर भाष्य करण्यात आलं आहे, असं भुजबळ म्हणाले.

काही लोक खोटं सर्टिफिकेट घेऊन कुणबी झालेत. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आपल्या देशामध्ये अशा गोष्टी काही नवीन नाहीत. पण, ते होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.

बालिश आरोप मनोज जरांगे करत आहेत. छगन भुजबळ बीडमध्ये जाऊन दंगल करु शकतो का? पकडलेली बंदूकधारी माणसं जरांगेंची आहेत. २४ तास त्यांच्यासोबत राहणारे माणसं आहेत. माझा काहीच संबंध नाही. मी कित्येक वर्षे बीडमध्ये गेलो नाही. मी माझ्याच लोकांची घरं जाळण्यासारखा अमानुष नाही. ५७ वर्षे राजकारणात आहे. अनेक आंदोलन केली. कुणाला दगड देखील मारले नाही, असं भुजबळ म्हणाले.

जरांगेंच्या माणसाकडे पिस्तुलं, हत्यारं किती सापडताहेत. दोन नंबरचे धंदे करणारे लोक त्यांच्यासोबत आहेत. कोर्ट जरागेंसारखं मूर्ख नाही. माझ्या केसचा आणि या भूमिकेचा काहीच संबंध नाही. गेल्या अनेकवर्षांपासून मी ओबीसींसाठी लढतो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मी कोणत्या महापुरुषांना बदनाम केलं. छत्रपती शिवाही महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आमचे देव आहेत. अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव होळकर हे सर्व आमच्या हृदयात आहेत. जरांगेंना महापुरुषांची नावे देखील माहिती नाहीत. त्यांच्या बॅनरवर महात्मा फुलेंचा फोटो देखील नसतो. कुठेच त्यांचा फोटो नसतो, अशी टीका त्यांनी केली.

 ncp chhagan bhujbal
Pune News : हुबेहुब सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा वाटायला हवी; छगन भुजबळ

लोकप्रतिनिधींना वाटतं की आपण मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोललो तर लोक आपल्याला मतदान करणार नाही. ओबीसी नेत्यांना देखील तसं वाटतं. पण, आता अनेक नेते जरांगे विरोधात बोलायला लागले आहेत. नारायण राणे, रामदास कदम यांनी वेगळ्या आरक्षणाची मागणी केली आहे, असं ते म्हणाले.

माझा लढा मनोज जरांगेंच्या झुंडशाही विरोधात आहे. लोकांची घरं जाळणं. सरकारला दमबाजी करणं, आरक्षण दिलं नाही तर बघून घेतो. भुजबळांना पाहून घेतो, कार्यक्रम करतो अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले पण आम्ही कुठे विरोध केला., असं ते म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.