मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीमध्ये यावं ही सगळ्याची इच्छा आहे. उद्याच्या निवडणुकीत आम्हाला अडचणी आहेत अशी स्थिती नाही. आम्ही एकदिलाने काम केलं तर लोक आम्हाला स्वीकारतील याचा आम्हाला विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष बसून जागावाटपाचा निर्णय घेऊ. खरगेंना मी स्वत: सूचवलंय की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करा, असं ते म्हणाले.
बच्चू कडू यांच्याकडे मी चहा पिण्यासाठी जात आहे. राजकीय कारणासाठी मी त्यांच्याकडे जात नाहीये. ते एका मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी मला चहाला येण्यासाठी विनंती केली. त्यामुळे मी त्यांच्याकडे जात आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही, असं शरद पवार म्हणाले. काँग्रेसच्या बैठकीत काय झालं ते मी सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले.
जागावाटपाचा मुद्दा एकत्र बसून सोडवण्यात येईल. समाजवादी पार्टीला दुखवून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. १९७७ साली देखील पंतप्रधान पदाचा चेहरा देण्यात आला नव्हता. निवडणूक जिंकल्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आले, अशी आठवण शरद पवार यांनी करुन दिली. तीन राज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे नाही, असं शरद पवार म्हणाले.
राम मंदिराचं निमंत्रण मला आलेलं नाही. अशा कार्यक्रमांना जाणं मी टाळतो. पण, माझेही काही श्रद्धास्थान आहेत. त्याठिकाणी मी जात असतो. पण, याची मी जाहीरात करत नाही. सरकारकडे दुसरा कोणता मुद्दा नाही. त्यामुळे केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावर लक्ष दिलं जात आहे, असं म्हणत पवारांनी निशाणा साधला.
संसदेत घुसखोरी झाली. त्यावर प्रश्न विचारले म्हणून १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यांची काय चूक होती. सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात आणि गॅस सोडतात त्याची माहिती घ्यायला नको का? संसद सरकार कशा पद्धतीने चालवू पाहतेय याचा हा उत्कृष्ट नमुदा आहे, असं शरद पवार म्हणाले.
एकच नेता राम मंदिराबाबत हे मी केलं म्हणून समोर आला होता. शिवसेनेची यात भूमिका आहे हे मी खूद बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं आहे. राम मंदिर झाले याचा आम्हाला आनंद आहे. मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे, असं पवार म्हणाले.
नाना पाटेकर यांच्यासोबत माझी घनिष्ठ मैत्री आहे. त्यांच्या निवडणुकीच्या चर्चा मी पत्रकारांच्या तोंडूनच ऐकतोय, असं पवार म्हणाले. नाना पाटेकर खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु आहे. यावरुन पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.