maharashtra legislative assembly Election
विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.