NCP Constitution: "कोणीही कोणाला काढू शकत नाही, राष्ट्रवादीची रचनाच फ्रॉड"; पटेलांचा मोठा दावा

मी केलेली जयंत पाटलांची नियुक्ती देखील बेकायदा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
praful patel
praful patelSakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीच्या घटनेनुसार पक्षाची संघटनात्मक रचना झालेली नाही, त्यामुळं कोणीही कोणाला पक्षातून काढू शकत नाही, असा दावा अजितदादा गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. असं सांगताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेली बैठक बेकायदा असल्याचा दावा केला आहे. (NCP Constitution No one can remove anyone organizational structure of NCP is fraud Prafull Patel big claim)

praful patel
Raj Thackeray: राजकीय घडामोडींना वेग! राज ठाकरे CM शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी

प्रफुल्ल पटेल म्हणाले, काल दिल्लीत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली, ती अधिकृत नव्हती. पक्षाचे काही नियम आहेत, पक्षाची नियम आणि घटना तयार करावी लागते. घटनेतील नियमांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीही निवडुका झालेल्या नाहीत.

त्यामुळं पक्षातील सर्व नियुक्त्या या बेकायदा आहेत. त्यामुळं काल शरद पवारांनी ज्या ९ आमदारांसह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरील निलंबनाची कारवाई चुकीची आहे. कोणीही कोणावर कारवाई करु शकत नाही, असंही पटेल यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

praful patel
Andhare on Gorhe: गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशामुळं तानाजी सावंतांच्या मंत्रीपदावर गदा येणार?; अंधारेंच्या ट्विटमुळं चर्चा

सन २०२२ मध्ये अधिवेशन झालं तरी ते खुलं अधिवेशन होत, यामध्ये निवडणूक प्रकिया झाली नव्हती. महाराष्ट्रातच राष्ट्रवादीमध्ये कधीच निवडणुका झाल्या नाहीत, तर इतर ठिकाणचा तर विषयच येत नाही. त्यामुळं माझ्या सह्यांनी काही पदाधिकारी नियुक्त्या झाल्या होत्या, त्या देखील बेकायदा आहेत. (Marathi Tajya Batmya)

praful patel
Neelam Gorhe ShivSena: काश्मीरात तिरंगा झेंडा, समान नागरी कायदा...; गोऱ्हेंनी स्पष्ट केली भूमिका

त्यानुसार, मी माझ्या सहीने राष्ट्रीय पातळींवर अनेक नियुक्त्या केल्या आहे, त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत. त्याचप्रमाणं मी नियुक्ती केलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती देखील बेकायदा आहे. त्यामुळं आम्हाला अपात्र करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. राष्ट्रवाची प्रदेशाध्यक्षच बेकायदा असेल तर कारवाई कशी होईल? अशा शब्दांत पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.