NCP Constitution: महाराष्ट्राचे राजकारण जगात चर्चेत आहे. एक काल्पनिक कथा वाटावी, अशा राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहेत. अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांनी मोठा झटका दिला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांना घेऊन मोठा बंड केला आहे. अजित पवार येवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करताना काकांना मोठा धक्का दिला.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार या निवड प्रक्रियेत शरद पवार यांचीही उपस्थिती आवश्यक असल्याने ते कार्यकारिणीचाही एक भाग आहेत. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया किमान दोन आठवड्यांपूर्वी सुरू व्हायला हवी होती. अजित पवार यांनी ३० जून रोजी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले होते. त्यामुळे अजित पवार यांचा गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार, पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवाराचे नाव १० सदस्यांनी सुचवावे लागते. नावे सादर करण्याची तारीख कार्यकारिणीला ठरवावी लागते. ठराविक तारखेपर्यंत हा प्रस्ताव रिटर्निंग ऑफिसरला प्राप्त झाला पाहिजे. कार्यकारिणीचे सदस्य असल्याने या संपूर्ण प्रक्रियेत पक्षाध्यक्षांचा (शरद पवार) सहभाग असतो. जाहीर करण्यात येणारी उमेदवारांची नावे आणि मतदानाची तारीख यामध्ये किमान सात दिवसांचे अंतर असावे.
राष्ट्रवादीच्या घटनेत अनेक असे मुद्दे आहेत जे अजित पवार गटासाठी चिंतादायक ठरू शकतात. समित्यांनी मतदान केल्यानंतर मतपेट्या राष्ट्रीय समितीकडे पाठवल्या पाहिजेत, असे राष्ट्रवादीच्या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यात पुन्हा पक्षाध्यक्षांची (शरद पवार) भूमिका समोर येते.
अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याच्या प्रक्रियेत हे नियम पाळले गेले की नाही, याची माहिती सध्यातरी कोणाकडे नाही. मात्र बंडखोरांच्या मनसुब्याबाबत आपण पूर्णपणे अंधारात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार गटाने आपल्याला पत्र लिहून पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केल्याची माहिती आपल्याला का देण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.