NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

मी कधी लपून-छपून जाणारा कार्यकर्ता नाही, तर उजळ माथ्याने जातो - अजित पवार
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal
Updated on
Summary

'भविष्यात आम्ही कधीही भेटला तर ती कौटुंबिक भेट असेल. दिवाळी असो किंवा दसरा असो ती भेट कौटुंबिकच असेल.'

कोल्हापूर : उद्योगपती चोरडिया (Chordia) आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. त्यामुळे पुण्यात त्यांच्या घरी मी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आम्ही भेटलो. याला राजकीय रंग देऊ नका. कारण, मी लपून-छपून नव्हे तर उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

Sharad Pawar vs Ajit Pawar
25 आमदार राजीनामा देणार अन् लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सरकार कोसळणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांना पुण्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी हा खुलासा केला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पुण्याच्या बैठकीतील काही मनावर घेऊ नका. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. ही भेट लपून-छपून आणि राजकीय होती, अशी टीका होते. मी कधी लपून-छपून जाणारा कार्यकर्ता नाही, तर उजळ माथ्याने जातो.

जयंत पाटील ही या बैठकीत होते. चोरडिया आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी तेथे जेवायला बोलवले होते. ही भेट घरगुती होती. भविष्यात आम्ही कधीही भेटला तर ती कौटुंबिक भेट असेल. दिवाळी असो किंवा दसरा असो ती भेट कौटुंबिकच असेल. त्यामुळे यावर कोणतीही चर्चा करू नका, असंही त्यांनी सांगितलं.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद दिले जाणार असल्याचे सांगितले होते. यावर पवार म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत त्यांचे कधी बोलणे झाले हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर काहीही बोलू शकत नाही.’

‘गाडी धडकली त्यात मी नव्हतो’

चोरडिया यांच्या निवासस्थानाच्या गेटवर गाडी धडकली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. याबाबत विचारले असता जी गाडी धडकली त्यात मी नव्हतो. ते वाहनही माझे नव्हते. त्यामुळे यावर मी काहीही बोलू शकत नसल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Ravikant Tupkar : तेच तेच म्हणणे कितीवेळा मांडू? तुपकरांचा राजू शेट्टींना उद्विग्न सवाल; दहा पानांच्या पत्रातून भूमिका जाहीर

प्रोत्साहनात्मक अनुदान लवकरच मिळणार

प्रामाणिक आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जात आहे. काही शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना लवकरच हे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी निधीचेही नियोजन केले असल्याचे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.