NCP Crisis : अजित पवार गटाच्या त्या खेळीने वाढणार शरद पवारांचं टेन्शन? सुप्रीम कोर्टात...

या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनाणवी पार पडणार आहे.
NCP Political Crisis
NCP Political CrisisEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात पक्ष आणि निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. याप्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. यादरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष दिरंगई करत असल्याने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या याचिकेवरील सुनावणी एकत्रितपणे होणार आहे. यादरम्यान या सुनावणीआधीच अजित पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

NCP Political Crisis
Devendra Fadnavis : 'नॅचरल फ्लोमध्ये...'; टोलबद्दल फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याबाबत दादा भुसेंचं स्पष्टीकरण

सुप्रीम कोर्टात दाखल झालेलं आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यात आहे. त्यामुळे आम्हाला या प्रकरणात आमचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. आम्हाला आमचं मत मांडायचं असून ते ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती देखील अजित पवार गटाकडून कोर्टात करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे दाखल केलेल्या या तीन हस्तक्षेप याचिका कोर्टाने स्वीकारल्या, तर त्यांच्या वतीने 3 वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात का निर्णय देतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

NCP Political Crisis
Israel-Hamas War : इस्रायली सैन्याकडून 250 ओलिसांची सुटका, 60 हमास दहशतवादी ठार; लाइव्ह ऑपरेशनचा व्हिडीओ केला जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.