NCP Crisis: राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल; आव्हाडांचा गंभीर आरोप

सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच अजितदादा गटानं निवडणूक आयोगात आमदारांच्या सह्यांचं पत्र दिल्याचं आता उघड झालं आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad
Updated on

मुंबई : अजित पवारांनी काही सहकाऱ्यांसोबत वेगळी चूल मांडल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पण राष्ट्रवादी फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामील असल्याचं गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. (NCP Crisis ECI also involved in conspiracy to break NCP a serious allegation made by Jitendra Awhad)

Jitendra Awhad
Sharad Pawar: शिवसेनेबरोबर का गेलो? शिवसेना, भाजपत फरक काय?; पवारांनी दिलं अजितदादांना उत्तर

आव्हाड म्हणाले, अजितदादा गटाचे लोक ३० तारखेला निवडणूक आयोगाकडं गेले आणि ५ तारखेला आयोग सांगतंय की ते आमच्याकडं आले होते. का निवडणूक आयोगाला याआधी हे कळवता आलं नाही? म्हणजे हा कटाचा, षडयंत्राचा भाग आहे. यामध्ये इलेक्शन कमिशन देखील सामिल आहे. हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला बॅकडेटेट करायला किती वेळ लागतो?

Jitendra Awhad
NCP Crisis: अजितदादांची याचिका निवडणुक आयोगात पोहोचली; राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर सांगितला दावा

तुम्ही हेच प्रयोग कर्नाटकात, मध्य प्रदेशात, गोव्यात केलेत. पण सगळीकडून लोकांचा उद्रेक दिसतोय. लोकांना हे पटत नाहीए. सत्ताकेंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वट्टेल ते करायचं असेल तर हा देश तुटला म्हणून समजावं, अशा शब्दांत आव्हाडांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.