Jayant Patil News : जयंत पाटलांनंतर त्यांच्या निकटवर्तीयांना 'ईडी'ची नोटीस; राष्ट्रवादीत हालचालींना वेग!

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patilesakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या निकटवर्तीयांना देखील ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी झाली असताना आता निकटवर्तीय देखील अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान ईडीच्या कारवाईनंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा द्यावा याबाबत दबाव असतानाच आता जयंत पाटील यांचे निकटवर्तीयाला अशा प्रकारची नोटीस आली आहे. यामुळे जयंत पाटील लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

दरम्यान या ईडीच्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी पक्षात मात्र हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अचानक शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Pune News : लॅम्बोर्गिनी खाली चिरडलेल्या 'डॉन'साठी गुडलक चौकात होणार शोकसभा; वंसत मोरे म्हणतात, "याला धडा शिकवणार..."

काल नेमकं काय झालं?

चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा सर्किट हाऊसकडे रवाना झाला. मात्र त्यानंतर ताफा तिथेच ठेवून अजित पवार एका गाडीत बसून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. विशेष म्हणजे काहींच्या मते जयंत पाटील हेदेखील बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र याबद्दल अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil
Chandni Chowk Flyover : चांदणी चौक पुलाच्या लोकार्पणावेळी गडकरी मेधा कुलकर्णींना विसरले नाहीत; सांगितली 'ती' आठवण

ईडीच्या कारवाईवर चर्चा?

दरम्यान उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या या बैठकीमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यामधून मार्ग काढण्यासंबंधी चर्चा झाल्याचे देखील बोलले जात आहे.

तसेच लवकरच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या बैठकीत जयंत पाटील अजित पवारांसोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.