Sharad Pawar : निवडणूक आयोग एकांगी भूमिका घेत आहे; शरद पवार गटाचा आक्षेप

Sharad Pawar & Ajit Pawar
Sharad Pawar & Ajit PawarEsakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही.. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष हे वेगळे आहेत. तरीही निवडणूक आयोग एकांगी भूमिका घेत आहे, असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने घेतला आहे.

पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातील लढाई निवडणूक आयोगामध्ये सुरु आहे. ६ ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी होईल. त्यापूर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडली आयोग एकांगी भूमिका घेत असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असताना पक्षामध्ये फूट पडली असं कसं म्हणता येईल, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. येत्या ६ ऑक्टोबरला आयोगामध्ये काय निर्णय होतो, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar
खाजगी डॉक्टर-नर्सची मदत घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न; अशोक चव्हाण यांची माहिती

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगातील तारखेबाबत भाष्य केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं की, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल तारीख देत असतील तर निवडणूक आयोगाचा पेपर फुटलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांचे विमान बराच काळ हवेतच, सतर्कतेने टळला धोका!

सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सुनिल तटकरे म्हणाले की, पेपर फुटला नाही तर स्वच्छपणे समोर आहे. लेखी परीक्षेला २५ मार्क, तोंडी परीक्षेला २५ मार्क आणि मैदानी चाचणीला ५० मार्क आहेत. त्यामुळे अभ्यास करुनच पटेल आणि मुंडे बोलले असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.