ED च्या भीतीनं सत्तेत गेलो नाही, यापूर्वी अनेकवेळा सत्तेत जाण्याबाबत शरद पवारांनी चर्चा केली; मुश्रीफांचा गौप्यस्फोट

शरद पवार हे काल, आज आणि उद्याही आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहे.
Hasan Mushrif Sharad Pawar
Hasan Mushrif Sharad Pawaresakal
Updated on
Summary

आपण ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात कसलेही तथ्य नाही.

कोल्‍हापूर : ‘शरद पवार हे काल, आज आणि उद्याही आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तसेच त्यांच्यासोबत जिल्‍ह्यातील जे कार्यकर्ते गेले आहेत, त्यांच्याविरोधात कोणीही काहीही बोलू नये’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

Hasan Mushrif Sharad Pawar
Raju Shetti : 'राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार लुच्चे, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'

यावेळी त्यांनी सीपीआर हॉस्‍पिटलचा कायापालट करण्यासह जनता दरबार घेण्याची घोषणा केली. जिल्‍हा राष्‍ट्रवादीच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, महिला जिल्‍हाध्यक्षा शीतल फराकटे, युवराज पाटील, भय्‍या माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, मनोज फराकटे, महेश सावंत, संभाजी देवणे, आदिल फरास, आसिफ फरास, जहिदा मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.

मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘अजित पवार यांनी राज्यातील सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतच्या घडामोडी सर्वांना माहिती आहेत. यापूर्वीही असे प्रयत्‍न झाले होते. त्यातील दोन घटनांचा मी साक्षीदार आहे. या मंत्रिमंडळात वैद्यकीय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या माध्यमातून सीपीआर हॉस्‍पिटलचा कायापालट करण्यात येईल.

Hasan Mushrif Sharad Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्रात मिशा पिळायच्या अन् दिल्लीला साडी नेसून जायचं; 'या' साहित्यिकानं कोणावर साधला निशाणा?

या हॉस्‍पिटलला एवढ्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील, की लोक खासगी हॉस्‍पिटलमध्ये जाणे विसरतील. मागील सत्तेत सतेज पाटील तसेच यड्रावकर यांच्यासोबत जनता दरबार घेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, कोरोनामुळे त्यात अडचण आली. आता मात्र दर महिन्याला जनता दरबार घेणार आहे. ऑगस्‍ट महिन्यातील पहिला जनता दरबार ७ ऑगस्‍टला घेणार आहे.’ यावेळी आमदार राजेश पाटील यांनी जिल्‍ह्यातून ४ ते ५ आमदार निवडून देण्याचे आवाहन केले.

कागलकरांनी जास्‍त वेळ घेऊ नये

‘जिल्‍ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणे आवश्यक आहे. यासाठी सर्व तालुक्यात फिरुन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे आवश्यक आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही सर्व तालुक्यातील लोकांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे कागलच्या कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांचा जास्‍त वेळ घेऊ नये’, असा टोला जिल्‍हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी लगावला. तर राजू लाटकर यांनीही शरद पवार गटावर टीका न करण्याचा सल्‍ला दिला.

Hasan Mushrif Sharad Pawar
Balasaheb Thorat : 'त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यामुळं एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

ईडीच्या भीतीने सत्तेत नाही

आपण ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात कसलेही तथ्य नाही. यापूर्वीही अनेकेवळा सत्तेत जाण्याबाबत शरद पवार यांनी चर्चा केली होती. तेव्‍हा ईडीची चौकशी नव्‍हती. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा करू नयेत, असे आवाहनही मुश्रीफ यांनी यावेळी केले.

ते म्‍हणाले, ‘राज्यातील सत्तेला २०१४ मध्ये बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. तेव्‍हा माझी ईडीकडून चौकशी सुरू नव्‍हती. यानंतर २०१७ तसेच २०१९ मध्येही सत्तेत जाण्यासाठी चर्चा झाली होती. त्यावेळीही चौकशी सुरू नव्‍हती. यानंतर अलीकडे ईडीने कारवाई सुरू केली. तेव्‍हाही मला न्यायालयाने दिलासा आहे. आताही हेच न्यायालय आपणाला न्याय देईल. त्यामुळे ईडीमुळे सत्तेत गेलो, या चर्चेला काही अर्थ नाही.’

Hasan Mushrif Sharad Pawar
फडणवीस, बावनकुळेंना मी तलवार-वाघनख दिलंय, कारण शिवरायांनी..; काँग्रेसवर हल्ला करत काय म्हणाले उदयनराजे?

‘के.पीं.’चा पाठिंबा

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी शुभेच्‍छा देतानाच अजित पवार गटाला पाठिंबाही दिला आहे. खासगी कामानिमित्त आजच्या मेळाव्याला ते उपस्‍थित नाहीत. मात्र, त्यांनी काल पाठिंब्याची घोषणा केली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.