Hasan Mushrif : 'शरद पवार आमचे दैवत, सगळ्या पालख्या आमच्या विठ्ठलाकडं गेल्याशिवाय राहणार नाहीत'

ईडीच्या धाकाने नव्हे, तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नाही म्हणून त्यांना साथ देण्यासाठी आम्ही शिंदे - फडणवीस सरकारबरोबर गेलो.
Hasan Mushrif Kagal Sabha
Hasan Mushrif Kagal Sabhaesakal
Updated on
Summary

शरद पवार हे आमचे नेते व दैवत आहेत. शरद पवार व अजित पवार हे एकच पवार आहेत. अजित पवार हे पवारच आहेत. आजही मी पवार एके पवारच आहे.

कागल : ‘मी परिपक्व आहे, अपरिपक्व नाही. माझ्यावर कधीही पेपरवेटने टीव्ही फोडण्याची वेळ आली नाही. मी कधीही नॉटरिचेबल राहिलो नाही. मला कधीही इव्हेंट करावा लागला नाही. एखाद्या घटनेने मी कधीही विचलित झालो नाही.

फाजील आत्मविश्वास बाळगला नाही’, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता लगावला. यावेळी त्यांनी ईडीच्या धाकाने नव्हे, तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नाही म्हणून त्यांना साथ देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे - फडणवीस सरकारबरोबर गेलो, असा खुलासा केला.

Hasan Mushrif Kagal Sabha
Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर हसन मुश्रीफ काल कागलमध्ये आले. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश मंदिरापासून गैबीपीरापर्यंत सर्व देवतांचे त्यांनी दर्शन घेतले.

गैबी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून ते व्यासपीठावर आले. गैबी चौकामध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक, सायरा मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Hasan Mushrif Kagal Sabha
ना बोर्डावर नाव, ना नेत्याचा फोटो..; मुश्रीफांच्या मतदारसंघात झळकला 'साहेबप्रेमी' बॅनर, उलट-सुलट चर्चांना उधाण

मुश्रीफ म्हणाले, ‘आजच आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असे नाही. २०१४ मध्ये कोणाचेही बहुमत न झाल्याने राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहिले. ३५ - ४० वर्षे समाजकारण व राजकारण करीत आहे. विकासकामे किती केली याचे पुस्तक २०२४ च्या निवडणुकीत काढेन.’

खासदार मंडलिक म्हणाले, ‘आम्ही दोघे अनेक वेळा व्यासपीठावर एकत्र असतो. गेल्या काही दिवसांत मुश्रीफ कुटुंबीयांना त्रास झाला. अतिशय खंबीरपणे ते त्याला सामोरे गेले. सहीसलामत या चक्रव्यूहातून बाहेर आले. मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मुश्रीफ व सतेज पाटील यांचा सल्ला घेतला होता.’

ए. वाय. पाटील म्हणाले, ‘२०२४ ला मुश्रीफ हे लाखाच्या फरकाने विजयी होतील. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार त्यांनी सोडले नाहीत. मोदींना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार व दोन्ही खासदार निवडून आणूया.’

Hasan Mushrif Kagal Sabha
NCP Crisis : राष्‍ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह कोणाला मिळणार, अजितदादा की शरद पवार? देसाईंनी स्पष्टच सांगितलं..

यावेळी विजय काळे, शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक भय्या माने यांनी केले. यावेळी अनिल साळुंखे, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, शशिकांत खोत, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो पाटील आसुर्लेकर, विलास गाताडे, प्रकाश गाडेकर आदी उपस्थित होते.

अपमान व बदनामी करीत आहेत काय?

पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांना समरजित घाटगे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. या संबंधातील सर्व चर्चा पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या आहेत. असे असतानाही मग भाजपचे हे जिल्हाध्यक्ष त्यांचा अपमान करून बदनामी करीत आहेत की काय?’

शरद पवार हेच आमचे विठ्ठल

मुश्रीफ म्हणाले, ‘शरद पवार हे आमचे नेते व दैवत आहेत. शरद पवार व अजित पवार हे एकच पवार आहेत. अजित पवार हे पवारच आहेत. आजही मी पवार एके पवारच आहे. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते असून तेच आमचे विठ्ठल आहेत. राज्यातील सगळ्या पालख्या या आमच्या विठ्ठलाकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत.’

Hasan Mushrif Kagal Sabha
Uddhav Thackeray : पक्षात आऊट गोईंग सुरू असतानाच ठाकरेंना मोठा दिलासा; 'या' नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

मुश्रीफ यांची शेरोशायरी

आजच्या सत्कार सोहळ्यात मंत्री मुश्रीफ यांनी शेरोशायरीही केली. ते म्हणाले, ‘तुम लाख कोशिश कर लो मुझे रोकने की, मैं जब भी टूटा हूँ, जबजब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से आगे बढा हूँ.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.