NCP Crisis : 'अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने फटकारलं', पुढची सुनावणी 'या' तारखेला

NCP Crisis
NCP Crisisesakal
Updated on

नवी दिल्लीः 'राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाचा?' या वादावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. सोमवारी दुसरी सुनावणी संपन्न झाली. त्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अजित पवार गटाकडून चुकीची माहिती देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या वकिलांना फटकारलं असून सोमवारी सुनावणी स्थगित करण्यात आली. पुढची सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार गटाकडून चुकीची माहिती देऊन प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने हे प्रकरण ९ नोव्हेंबरला ठेवलं आहे. आम्हाला म्हणणं मांडण्यासाठी कमी वेळ मिळालेला असतानाही आम्ही ९ हजार प्रतिज्ञापत्रांमधअये त्रुटी काढलेल्या आहेत.

NCP Crisis
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; हायकोर्टाने फेटाळली याचिका

अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये ९ हजार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. कमी वेळेत आम्ही एवढ्या त्रुटी शोधल्या. आणखी पुरावे देण्यासाठी आणि म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. त्यामुळे सुनावणी एक महिन्यानंतर ठेवली आहे. आजच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं संपलेलं आहे.

NCP Crisis
Monsoon : संपूर्ण राज्यातून बाहेर पडला मॉन्सून

आयोगात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे थेट शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले गेले. शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करु शकतात? असा मुद्दा उपस्थित केला केला. शरद पवारांच्या कथित एकाधिकारशाहीचा मुद्दा अजित पवार गटाकडून पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.