NCP Crisis : ज्या पक्षात मी राहिलो, त्या पक्षाचा विश्वासघात कधी केला नाही; भास्कर जाधवांचा तटकरेंवर थेट वार

खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) राष्ट्रवादी फोडली याचे काहीच नवल वाटत नाही.
Bhaskar Jadhav vs Sunil Tatkare
Bhaskar Jadhav vs Sunil Tatkareesakal
Updated on
Summary

एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा विद्रूप चेहरा देशात जनतेसमोर येतोय आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाला तुमची आता गरज संपली.

चिपळूण : खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) राष्ट्रवादी फोडली याचे काहीच नवल वाटत नाही कारण, तटकरे कधीच विश्वासार्ह नव्हते. आम्ही पक्ष सोडला इतकंच फक्त दिसते; पण ज्या पक्षात आम्ही राहिलो त्या पक्षाचा विश्वासघात आम्ही केला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष फोडल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Bhaskar Jadhav vs Sunil Tatkare
Kagal Politics : समरजित घाटगे भाजपची साथ सोडणार? मुश्रीफांच्या मंत्रिपदाने नाराज; आज जाहीर करणार भूमिका

या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा पक्षाचे उमेदवार पराभूत कसे होतील, हे आम्ही पाहिले नाही. तटकरेंचा राजकीय प्रवास बघितलात तर ज्या शिडीने वर जायचे त्याच शिडीवर लाथ मारायची, अशी राजकारणाची शंभर उदाहरणे देता येतील.

Bhaskar Jadhav vs Sunil Tatkare
Maharashtra Politics : यशवंतराव ते अजित पवार..; गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने अनुभवलेली राजकीय बंडाळी

त्यामुळे त्यांनी हे जे काही केले त्यात नवल वाटत नाही. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा विद्रूप चेहरा देशात जनतेसमोर येतोय आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाला तुमची आता गरज संपली. तुम्हाला आता राहायचे तर राहा नाहीतर जा. ही भाजपची चाल उघड झाली.

जसा शिवसैंनिक उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहिला तसाच राष्ट्रवादीचा मतदार अधिक जोमाने शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहील. नेते गेले; पण जे नेते जन्माला घालणारे लोक आहेत ते महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत आहे.

भाजपने शिंदे गटातील आमदारांना एक वर्षे सातत्याने मंत्री करण्याचे गाजर दाखवले; पण एकालाही मंत्री केले नाही; मात्र अजित पवारांबरोबर गेलेल्या नऊजणांना कॅबिनेट मंत्री केले. भरत गोगावले सातत्याने सांगत होते आदिती तटकरे आम्हाला त्रास देतात, त्या आदिती तटकरे आता कॅबिनेट मंत्री झाल्या.

Bhaskar Jadhav vs Sunil Tatkare
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

शिंदे, फडणवीस यांचे भविष्य अंधारात

राजकारण काहीही असले तरी सर्वात अधांतरी व अंधकारमय भविष्य कोणाचे असेल तर ते एकनाथराव शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे आहे. फडणवीस यांना जसे पाहिजे तसे वाकवून घेतले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा राज्यात राहणार की दिल्लीत जाणार? आणि दिल्लीत जो जो गेला त्याची अवस्था काय झालीय हे आपण पाहिले आहे. त्यामुळे शिंदे व फडणवीस हे दोघेही आता जात्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.