NCP Crisis : आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार; निष्ठावंत आमदारानं विधानभवनात अजितदादांना स्पष्टच सांगितलं

आगामी काळात राष्ट्रवादीचे हे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.
Shashikant Shinde News
Shashikant Shinde Newsesakal
Updated on
Summary

माझी लढाई जातीयवादी पक्षांशी आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत सहभागी होऊ शकत नाही.

सातारा : ही व्यक्तिगत लढाई नसून विचारांची आहे. ज्यांना आपला विरोध आहे, अशा जातीयवादी पक्षासोबत मांडीला मांडी लावून बसायचे कितपत योग्य आहे. गेल्या चार वर्षांत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मला व माझ्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला गेला.

त्यांच्यासोबत आम्ही बसलो तर कार्यकर्ते हतबल होतील. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) उपमुख्यमंत्री अजितदादांपुढे मांडली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक कुटुंब असून, हे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे उपस्थितीत होते. या वेळी त्यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. दोघांत सुमारे अर्धातास सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. या वेळी शशिकांत शिंदेंनी अजितदादांसमोर आपली भूमिका मांडली.

Shashikant Shinde News
Maharashtra NCP Crisis : ना कार्यकर्त्यांशी चर्चा, ना कोणता निर्णय.. अजितदादांना का पाठिंबा दिला? आमदार निकम करणार उलगडा

या वेळी अजितदादांनी आमदार शिंदेंना आपल्या गटात येण्याविषयी विचारले. त्या वेळी त्यांनी आपण आजपर्यंत ज्यांच्याविरोधात भूमिका घेतली. त्यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न केला. मी संघर्ष करणारा नेता आहे. यापुढेही संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. त्यावर अजित पवारांनी त्यांना याबाबत काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवा. आपण या विषयावर नंतर बोलू, असे त्यांनी सांगितले.

Shashikant Shinde News
NCP Crisis : राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे कर्नाटकात हादरे; 'या' एकमेव नेत्यानं जाहीर केली भूमिका

यासंदर्भात आमदार शिंदे म्हणाले, ‘‘विधानभवनात अजितदादांशी माझी अर्धातास चर्चा झाली. मी माझी भूमिका त्यांच्यापुढे मांडली. पवारसाहेबांसह दोघांविषयी आम्हाला प्रेम, आदर आहे; पण तुम्ही पवारसाहेबांना सोडायला नको होते. यावर दादा भावनिक झाले. आजपर्यंत आम्ही भाजप, शिवसेनेशी लढा दिला आहे.

गेल्या चार वर्षांच्या वाटचालीत मला व माझ्या कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून खूप त्रास दिला आहे. कोरेगाव मतदारसंघात अजितदादा दौऱ्यावर आले, तर आता त्यांच्यासोबत महेश शिंदेही असणार आहे. मीही तुमच्यासोबत बसलो तर समोरचा कार्यकर्ता हतबल होणार आहे.

Shashikant Shinde News
NCP Crisis : अजितदादा फक्त 'मामा', आमचे नेते जयंतरावच; मुंबईतील 'त्या' भेटीवर महापौरांचं तातडीनं स्पष्टीकरण

माझी लढाई जातीयवादी पक्षांशी आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत सहभागी होऊ शकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीचे हे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या भेटीतील चर्चा मी शरद पवार यांना सांगितली. त्या वेळी तेही भावनिक झाले होते, असेही आमदार शिंदेंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.