NCP Crisis : पवारांचं एक पाऊल मागे! महत्वाचा दौरा सोडून मुंबईला परतणार; दिलं 'हे' कारण

NCP sharad Pawar
NCP sharad Pawarsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात भुकंप झाला होता. दरम्यान यानंतर अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना रंगला आहे. यादरम्यान पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी शरद पवारांनी राज्याच्या दौऱ्याची घोषणा केली होती. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पवारांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत.

उद्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथे शरद पवारांची सभा होणार आहे. मात्र त्यानंतर पवार पुन्हा मुंबईला परत येणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांची उद्याची येवल्याची सभा झाल्यानंतर त्यांचा उर्वरित दौरा ८ दिवसांनंतर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

NCP sharad Pawar
Maharashtra Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली! निवडणूक आयोगाच्या पत्रात उल्लेख

राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर शरद पवारांच्या या दोऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात होता मात्र पावसाचा अंदाज घेता हा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे धुळे आणि जळगाव येथील दौरे रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे.

NCP sharad Pawar
Buldhana Bus Accident : दारूने घेतला २५ निष्पापांचा बळी? बुलढाणा अपघातात मोठी अपडेट आली समोर

उद्धव ठाकरेंचा दौऱ्यातही बदल

उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशीम अमरावती दौरा, पोहरा देवी दर्शन ठरल्याप्रमाणे करणार आहेत. नागपूरला एक संध्याकाळी संवाद आहे तो संवाद वेळेअभावी रद्द करण्यात आला आहे. बाकी दौरा आहे तसाच होणार आहे.विदर्भातील इतर जिल्ह्यांचा पावसाळी अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे दौरा करतील अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.