NCP Crisis: राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्याची हाकालपट्टी; अजित पवारांसोबत गेल्यानं कारवाई

बंडात सहभागी झालेल्या अनेकांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीनं हाकालपट्टी सुरु केली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडात सहभागी झालेल्या अनेकांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीनं हाकालपट्टी सुरु केली आहे. यापूर्वी काही जणांची हाकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांची हाकालपट्टी केली आहे. (NCP Crisis two more NCP leaders Umesh Patil and Sanjay Khodke sacked action after going with Ajit Pawar)

राष्ट्रवादीनं यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत या दोन नेत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये म्हटलं की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री आणि मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी उमेश पाटील उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.

तसेच संजय खोडके हे देखील या शपथविधीसाठी उपस्थित राहिले. त्यांचं हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणांच्या विरोधी आहे. त्यामुळं त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून तसेच प्रदेश उपाध्यक्षपदावरून तातडीनं बडतर्फ करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.