राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट फडल्यानंतर आता राष्ट्र्वादी पक्ष कोणाचा या मुद्द्यावर अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसोर उभे ठाकले आहेत. निवडणुक आयोगासमोर याबाबत सुनावणी सुरू आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्हाबाबात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आज पार पडणार आहे.
यादरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हा पक्षात फूट पडून पक्षाचं चिन्ह आणि नाव यावरून वाद सुरू आहेत. यादरम्यान ठाकरे गटाकडून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. निवडणुक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळीअजित पवार गटाकडून शरद पवारांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
"शरद पवार हे हुकूमशहा आहेत व त्यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केला. पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने दावा सांगितला व निवडणूक आयोग अजित पवारांचा युक्तिवाद ऐकून घेत आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होते व अजित पवारांचे वकील ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच’ असे नरडे ताणून सांगत होते. निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या संदर्भात हेच घडले."
"शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. याच दोन्ही पक्षांनी शिंदे व अजित पवारांसारख्यांना पदे दिली. त्यामुळे मूळ पक्ष महत्त्वाचा. आता शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्षाचा कारभार चालवतात असे अजित पवार म्हणतात. पक्ष घरातलाच असल्यामुळे अजित पवार चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले व श्री. शरद पवार यांचा वरदहस्त होता म्हणूनच ‘ईडी’ने अजित पवारांना तसा हात लावला नाही. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बेइमानी केली हे ठीक, पण त्यांनी मातृपक्षावरच दावा सांगितला ही लफंगेगिरी म्हणावी लागेल." अशा शब्दात सामनाच्या अग्रेलेखातून टीका करण्यात आली आहे.
"स्वतःच्या नेतृत्वात इतकी क्षमता व कुवत होती तर त्यांनी स्वतःचे वेगळे पक्ष स्थापन करून लोकांचा कौल घ्यायला हवा, पण भारतीय जनता पक्ष हे त्यांचे नवे मालक असून मालकाच्या इशाऱ्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला जात आहे. शरद पवार हुकूमशहा आहेत, असा आरोप झाला आहे, पण याच ‘हुकूमशहा’ने तुरुंगातून सुटून आलेल्या छगन भुजबळांना मंत्री केले व तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही राजवस्त्रे दिली. पवारांच्या कारभारातील ‘हुकूमशाही’ तेव्हा या लोकांना टोचली नाही." असा घणाघात ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
"शिंदे यांच्या मिंधे गटाप्रमाणेच अजित पवारांचा गट भाजपच्या टाचेखाली चिरडला गेला आहे. अजित पवार यांचा युक्तिवाद असा की, ‘‘एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही.’’ अजित पवार सध्या ज्या भाजपच्या कच्छपी लागले आहेत तो पक्ष काय लोकशाही मार्गाने चालवला जात आहे? पक्षाचे अध्यक्ष ‘नड्डा’ हे नामधारीच असून नड्डा यांचा ‘नाडा’ मोदी-शहांच्या हाती आहे. अजित पवार व शिंदेदेखील त्याच नाड्यात गुंतून पडले आहेत." असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.