NCP Crisis : बालेकिल्ल्यातच शरद पवारांना मोठा धक्का; साहेबांसोबत गाडीतून प्रवास करणारे मकरंद आबा दादांच्या गोटात!

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर साहेब की दादा अशी सर्वांचीच मनःस्थिती झाली होती.
MLA Makarand Patil supports Ajit Pawar
MLA Makarand Patil supports Ajit Pawaresakal
Updated on
Summary

शरद पवार साहेब यांच्याशी पाटील घराण्याशी असलेल्या भावनिक जवळिकीमुळे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतो, असे अजितदादांना सांगितले होते.

सातारा : राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर खासदार शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील यांनी काल देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला. मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याची घोषणा या वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केली.

MLA Makarand Patil supports Ajit Pawar
Maharashtra NCP Crisis : ना कार्यकर्त्यांशी चर्चा, ना कोणता निर्णय.. अजितदादांना का पाठिंबा दिला? आमदार निकम करणार उलगडा

त्यामुळे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता तीन आमदारांचा समावेश झाला असून, वाई मतदारसंघातील सर्व कार्यकर्तेही त्यांच्यासोबत राहणार आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर साहेब की दादा अशी सर्वांचीच मनःस्थिती झाली होती. मकरंद पाटील यांचे नाव अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत होते.

त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतही होते; पण शरद पवार साहेब यांच्याशी पाटील घराण्याशी असलेल्या भावनिक जवळिकीमुळे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतो, असे अजितदादांना सांगितले होते. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता जिल्ह्यात होती. याच दरम्यान, कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार आले होते.

MLA Makarand Patil supports Ajit Pawar
NCP Crisis : राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे कर्नाटकात हादरे; 'या' एकमेव नेत्यानं जाहीर केली भूमिका

त्या वेळी वेळे येथूनच त्यांच्या गाडीत बसून आमदार मकरंद पाटील आले होते. त्यांनी सर्वांना धक्का देत आज चर्चेला पूर्णविराम दिल्याचे दाखवून दिले; पण त्यानंतर वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांनीच किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मकरंद पाटलांनी अजित पवारांसोबत जावे, असा सूर निघाला. त्यामुळे मकरंद पाटील द्विधा मनःस्थितीत होते.

MLA Makarand Patil supports Ajit Pawar
MLA Makarand Patil supports Ajit Pawaresakal

आजच ते जिल्हा बॅंकेच्या संचालकांसोबत युरोपच्या १८ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. आज दुपारीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी दादांसोबत असल्याचे स्पष्ट केले. या वेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले.

MLA Makarand Patil supports Ajit Pawar
NCP Crisis : अजितदादा फक्त 'मामा', आमचे नेते जयंतरावच; मुंबईतील 'त्या' भेटीवर महापौरांचं तातडीनं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर अजित पवार व मकरंद पाटील यांची सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. या वेळी प्रताप पवार, प्रमोद शिंदे, ॲड. शामराव गाढवे, मनीष भंडारी, राजेंद्र तांबे, अनिल सावंत, रमेश गायकवाड, शशिकांत पिसाळ.

तसेच राजेंद्र राजपुरे, मोहन जाधव, उदय भोसले, मदन भोसले, किरण काळोखे, चरण गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, अमित कदम, उदय कबुले, अजय भोसले, संजय गायकवाड, अफजल सुतार, नारायण बिरामणे, शेखर कासुर्डे, महादेव मस्कर, भारत खामकर, प्रदीप जायगुडे, राजेश गुरव, संग्राम पवार, संदीप नायकवडी, नारायण जाधव आदींसह सुमारे अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA Makarand Patil supports Ajit Pawar
NCP Crisis : आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार; निष्ठावंत आमदारानं विधानभवनात अजितदादांना स्पष्टच सांगितलं

विकासकामे झाली पाहिजेत - अजित पवार

या कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘आपली कामे झाली पाहिजेत. राज्य पुढे गेले पाहिजे. केंद्रातल्या सरकारचे सहकार्य असेल, तर कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी आपण हा निर्णय घेतला पाहिजे, असे आम्ही सगळ्यांनी शरद पवार साहेबांना सांगितले होते.

महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा या तालुक्यांतील प्रश्‍न सुटले पाहिजेत. किसन वीर कारखाना, खंडाळा कारखान्याचे प्रश्‍न आहेत. तेही सुटले पाहिजेत. मी विकासकामात दुजाभाव करीत नाही. सातारा आणि जावळी तालुक्यांतील अनेक कामांसाठी मी शिवेंद्रसिंहराजे यांनाही मदत केलेली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.