राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या परिषदेतील गटनेतेपदी खडसेंची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली.(ncp hand over a big responsibility to eknath khadse )
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे.
खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.