Jayant Patil : 'शासन आपल्या दारी'मध्ये व्यस्त सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी'ची जाणीव आहे का? पाटलांनी मांडली दाहकता

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit PawarSakal
Updated on

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली असून शेतकरी सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी करत आहेत. यादरम्यान या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमावरून राज्यातील दुष्काळाच्या स्थितीवर भाष्य केलं आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे. जयंत पाटील म्हणाले आहेत की, "सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे."

"सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे." असेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीपूर्वी गोध्राची पुनरावृत्ती? राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, राम मंदिर...

"खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे." असेही त्यांनी म्हटले आहे.

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Pankaja Munde News : विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा मैदानात! देवदर्शनासाठी राज्यभरात करणार ५ हजार किमीचा 'शिवशक्ती' दौरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.