Jayant Patil : अमित शाहांना भेटल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले...

NCP Jayant Patil
NCP Jayant Patilesakal
Updated on

अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळालं. यानंतर शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले जयंत पाटील हे देखील अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अखेर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याविषयी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू होणे योग्य नाही. काय झालं, काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे.

NCP Jayant Patil
Crime News : संतापजनक! अल्पवयीन मुलांना बळजबरीने लघवी प्यायला लावली; शारीरिक इजेसाठी केला मिरचीचा वापर

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी सकाळपासून या बातम्यांमुळे करमणूक होतेय, मी इकडे गेले, मी पुण्याला गेलो अशा...अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, मी आणि अजून एकजण रात्री दीड वाजेपर्यंत इथेच बसलेलो होतो. मग मी कधी पुण्याला गेलो. सकाळी, काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी तिकडे कधी गेलो? मी त्यांना कधी भेटलो याचं संशोधन झालं पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.

NCP Jayant Patil
Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या दौऱ्यात ऐनवेळी मोठा बदल! कार्यक्रमानंतर सर्व बैठका रद्द; तातडीने गाठणार दिल्ली

शाह यांची भेट घेतल्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चेनंतर जयंत पाटील हे देखील लवकरच अजित पवार गटात सामील होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचेही बोलले जात होते.

यादरम्यान जयंत पाटलांनी माध्यमांसमोर येत या दाव्यातील हवा काढून घेतली, ते म्हणाले की, मी काही बोललो, कोणाला भेटलो असं काही आहे का? असं नसेल तर अशा बातम्यांमुळे सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चालला आहे, त्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं आहे. माझा पक्ष मोठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी आहे इथेच आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार गट, भाजप अशा बातम्या पेरतो असं मी म्हणाणार नाही, पण एका मोठ्या चॅनलने कालपासून बातमी चालवली आहे, असे म्हणात जयंत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याचे वृत्त फेटाळून लावलं आहे. माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये, मला कोणी काही बोललं नसून माझी कोणासोबत चर्चाही झाली नाहीये, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.