मराठी चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्यावरून आक्रमक भूमिका घेतलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad Arrest) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील एका मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपट सुरू असताना एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं असं म्हणत आव्हाडांनी त्याच्या अटकेपूर्वीचा नाटकीय घटनाक्रम सांगितला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ ( Har Har Mahadev Movie Controversy) चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चित्रपट गृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर जाण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे.
“आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो,” असं आव्हाडांनी सांगितलं आहे.
पुढे आव्हाड म्हणाले की, “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल,” असे आव्हाड यांनी सांगितलं.
“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” असं देखील आव्हाड यावेळी म्हणालेत.
दरम्यान आजच जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर गर्दी करत घोषणाबाजी देखील केली, यानंतर कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.