राष्ट्रवादीचे नेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केल्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, तसेच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याकडून विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या कौतुकावर आव्हाडांनी मरीन पण विचारांची लढाई लढत राहीन असा शब्द शरद पवारांना दिली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केलं आहे, ते म्हणाले की, "तुमचा विश्वास मला लढतांना हत्तीचे बळ देते .. मरीन पण विचारांची लढाई लढत राहीन …साहेब आपले आशिर्वाद हीच माझी ताकद"
हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
पवार काय म्हणालेत..
"जो प्रभावी असा लोकप्रतिनिधी आहे. त्याच्या कामात अडथळा निर्माण करणे, त्याला नाउमेद करणे, सत्तेचा गैरवापर करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला त्याच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी पूर्ण खात्री आहे की, जितेंद्र आव्हाड कधी या सर्वांना बळी पडणार नाही. जो आमचा विचारांचा लढा आहे त्याच्याशी ते तडजोड करणार नाही," असे शरद पवार म्हणाले.
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर काय म्हणाले?
पवारांनी आज पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या विषयावर त्यांची मते व्यक्त केली. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, "राज्याचे राज्यपालांचे वैशिष्ट्य आहे की, गेले अनेक वर्ष आपण बघतो की वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधान करणे, समाजामध्ये गैरसमज वाढेल यांची खबरदारी घेणे असेच त्यांचे मिशन आहे की काय अशी शंका येते. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाईंबाबत त्यांचे वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य पाहिले तर या सर्व गोष्टी असे सांगतात की, या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते. परंतु याचे यत्किंचितही स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे."
पुढे पवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा त्यांनी केलेला उल्लेख पाहता राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडलेल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचे कौतुक केले. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेले हे शहाणपण होते. राज्यपालांबद्दल अंतिम निकाल माननीय राष्ट्रपती व पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणे योग्य नाही" असे पवार म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.