Ajit Pawar Love Story : काय आहे अजित पवारांची लव्हस्टोरी? अशी झाली होती सुनेत्राताईंशी पहिली भेट

आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत.
Ajit Pawar Love Story
Ajit Pawar Love Storysakal
Updated on

Ajit Pawar Love Story : आपण सहसा लव्ह मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी बघतो पण अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर सुरू झालेली लव्हस्टोरी अधिक रोमांचक वाटते. आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. (ncp leader Ajit Pawar spouse wife sunetra pawar Love Story valentine week special)

Ajit Pawar Love Story
Ajit Pawar : साखरेच्या निर्यातीस केंद्राने मुभा द्यावी; अजित पवार

अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे १९८५ मध्ये लग्नबंधनात अडकले. दादांच्या लग्नाला ३७ वर्षे झाले. या ३७ वर्षात सुनेत्रा यांनी पदोपदी अजित पवारांना साथ दिली. अजित पवार आणि सुनेत्रा लग्नापूर्वी यांची लव्हस्टोरी नव्हती. अगदी सामान्यपणे अरेंज मॅरेज त्यांचे झाले.

अजित पवार एका मुलाखतीमध्ये सांगतात ,आमचं लव्हमॅरेज नाही. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांचे संबंध होते. मला काही मुलींची स्थळे आली होती. तर, काही पाहिली होती. नंतर सुनेत्रा यांचं स्थळ आलं. मग, पाहण्याचा कार्यक्रम झाला. पद्मसिंह पाटील यांच्या बंधुंच्या घरी तो कार्यक्रम पार पडला. यासाठी प्रतिभा काकींनी पुढाकार घेतला होता. चर्चा झाली आणि लग्न ठरलं.”

(Sunetra Pawar Padmasinha Patil)

बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न जुळले. एका मुलाखतीत सुप्रिया सुळे सांगतात,"दादा वहिनीला पाहून आल्यानंतर आम्ही काश्मिर ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी आम्ही दादाला सु नेत्रा नावाने प्रचंड चिडवले. त्यानंतर ३० डिसेंबर ला दादाचं लग्न झालं."

इतक्या वर्षाच्या संसारात सुनेत्रा यां नेहमीच दादासोबत खंबीरपणे उभ्या राहल्या. राजकीय संकट असो की दु:खाचे प्रसंग सुनेत्रा यांची अजित पवारांना साथ कायम होती पवार कुटूंबाला एकत्र घेऊन राहल्या. अजित पवार आणि सुनेत्रा यांना दोन मुलं आहे. आजही घरगुती कार्यक्रमात कधी गाण्याच्या मैफीलमध्ये तर कधी गोष्टींमधून अजित दादा आणि सुनेत्रा याचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येतं.

(sharad pawar supriya sule)

Ajit Pawar Love Story
Ajit Pawar : उमेदवारी अर्जावर विचारल्यानंतर अजित पवार भडकले म्हणाले, 'मला मूर्ख समजू ...'

मराठवाड्यातील एका राजकारणी घरात सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे पुढे सासरच्या राजकीय कुटुंबात रुळायला त्यांना वेळ गेला नाही. सुनेत्रा पवार या सामजिक कार्यात अग्रेसर आहे. बारामतीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना ‘वहिनी’ म्हणून हाक मारली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.