Sheetal Mhatre Video: शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावर अजित पवार म्हणतात, 'दूध का दूध पाणी का...'

विरोधी पक्षनेते अजित पवार या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटलेत
Sheetal Mhatre Video
Sheetal Mhatre VideoEsakal
Updated on

Shivsena News: शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. भाजप-शिवसेनेच्या महिला आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याविषयावर रोखठोक भाष्य केलं आहे

विरोधी पक्षनेते अजित पवार या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, "राजकीय क्षेत्रात असो किंबहुना कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःचं चारित्र्य जपणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सर्वसामान्य लोक आमच्याकडे 'पब्लिक फिगर' म्हणून पाहत असतात.

एकवेळ राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायची गरज नाही. मात्र, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले आहेत का? त्यामागे कुणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी झाली पाहिजे."

Sheetal Mhatre Video
Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे, एखाद्या महिलेची बदनामी नको. त्या व्हिडीओची स्पष्टपणे चौकशी करुन 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरण?

गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.

या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Sheetal Mhatre Video
Shivsena: 'तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या...' शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.