उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन, अजित पवारांनी केला विक्रम

ncp leader ajit pawar take oath as a deputy chief minister for fourth time
ncp leader ajit pawar take oath as a deputy chief minister for fourth time
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पुन्हा अशासाठी की एक महिन्यापूर्वी त्यांनी याच पदासाठी राज भवनात शपथ घेतली होती. पण, त्यावेळी पक्ष वेगळा होता आज, सर्वांसमवेत भव्य सोहळ्यात त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री 
अजित पवार यांनी गेल्या महिन्यात 23 नोव्हेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन, राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी ही ते उपमुख्यमंत्रि होते आणि आजही ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतानाही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर ते भाजप सोबतच्या औटघटकेच्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री होते. तर, आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारमध्येही ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं सर्व पक्षांसोबत उपमुख्यमंत्री होण्याचा आगळा-वेगळा विक्रम अजित पवार यांनी केला आहे. अवघ्या 37 दिवसांत अजित पवार पुन्हा वेगळ्या पक्षाच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी राजकीय कारकिर्दीत चौथ्यांदा उपमुख्यंमत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

सोशल मीडियावर चर्चा
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. त्याच राज्यपाल कोशियारी यांनी आज, पुन्हा अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यावेळचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अजित पवार यांना ट्रोल केलं जातंय. दरम्यान, अजित पवार यांनी शपथ घेताना, सभागृहात अजित पवार यांच्या समर्थकांना जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बारामती या त्यांच्या गावीही फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.