सदाभाऊंच्या माघारीनंतर मिटकरींचे ट्वीट म्हणाले, त्या फडणिसांना सांगा...

येत्या 20 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूका पार पडणार आहे.
Sadabhau Khot
Sadabhau Khot Sakal
Updated on

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी नुकत्याच झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर आता येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 जागांसाठी निवडणूका पार पडणार आहे. दरम्यान, विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल झालेल्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अर्ज माघार घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडूनह 6 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या माघारीनंतर राष्ट्रवीदचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी ट्वीट करत सदाभाऊंना सल्ला दिला आहे. (Vidhan Parishad Election News)

सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, "म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल." असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.

राष्ट्रवादीकडून गर्जेंचा अर्ज मागे

दरम्यान, भाजपतर्फे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी अगदी शेवटच्या क्षणी अर्ज माघार घेतला असून, राष्ट्रवादीतर्फे शिवाजीराव गर्जे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज माघारीमुळे आता विधानरपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजप या निवडणूकीत पाच जागा लढवणार आहे यामध्ये भाजप प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि प्रसाद लाड या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. तर शिवसेना सचिन अहिर, आमश्या पाडवी यांना संधी देत आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणूक रिंगणात असणार आहेत.

कुणाकडे किती मतं?

या निवडणूकीत मतांचा कोटा पाहाता महाविकास आघाडीकडे एकूण १६९ पक्षनिहाय कॉंग्रेस पक्षाकडे ४४ मते आहेत आणि त्यांच्याकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत विजयासाठी २७ मते आवश्यक असल्याने त्यांना १० मते कमी पडणार आहे. राष्ट्रवादी पक्षाकडे ५४ मते तर उरलेली शिवसेनेकडे उरलेली मते आहेत. तसेच निवडणूकीत भाजपने पाच उमेदवार दिले आहेत आणि भाजपकडे ११३ मते आहेत, त्यामुळे त्यांना देखील काही अपक्ष उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.