Ajit Pawar: "सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका"

जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तसेच अजितदादा होऊ शकतात
Ajit Pawar Press Conference Today
Ajit Pawar Press Conference Todayesakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार यांच्या या व्यक्तव्यानंतर अनेक चर्चांना तसेच शक्यताना उधाण आलं. पण हे खरंच शक्य आहे का? कोणत्या पक्षातून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील? यावर राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाचा जजमेंट नेमकं काय येतं हे मला माहिती नाही. मात्र यातील 16 आमदार हे अपात्र झाले. तर राजकारणातलं चित्र आणखी बदलू शकतो. जो 145 चा आकडा पूर्ण करेल तोच यानंतर मुख्यमंत्री होईल. कदाचित अजित दादा हे मुख्यमंत्री होण्याचा 145 चा आकडा जमवू शकतात. सध्या राजकारणात काही घडू शकतं. त्यामुळे पुढच्या कालखंडात या राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Ajit Pawar Press Conference Today
Amruta Fadanvis: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस म्हणाल्या, 'अजित पवारच...'

“अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Ajit Pawar Press Conference Today
Pankaja Munde: "… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे", पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

“अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं म्हटलं आहे. आपण उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय?”, असा प्रश्नही यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. “एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणता आकड्याचा खेळ होता? हा तर खोक्यांचा खेळ जमला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

Ajit Pawar Press Conference Today
Pune Accident: गाढ झोपेत असताना काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, तर 22 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()