Maharashtra Politics: राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा, राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचा नेता बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा
Sharad pawar
Sharad pawarEsakal
Updated on

आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यात राजकीय पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात हळुहळु के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सध्या विस्तारताना दिसत आहे. राज्यातील नेते, त्यांचे कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच पंढरपूरमधील राष्ट्रवादीचे समर्थक भालके कुटुंब. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके हे बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.(Latest Marathi News)

भगिरथ भालके राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भगिरथ भालके बीआरएस पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असण्याचं कारण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाचा आणि भालके यांचा संपर्क वाढल्याने ही शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत आहे.(Latest Marathi News)

Sharad pawar
Uddhav Thackrey: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा ठाकरेंना धक्का! दोन शिलेदारांनी सोडली साथ

दरम्यान भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा एक लाख पाच हजार मतं त्यांना मिळाली. भालके यांना मानणारी मोठी संख्या पंढरपुरची आहे. त्यामुळे भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडली तर राष्ट्रवादीसाठी पंढरपुरात हा मोठा धक्का असणार आहे.(Latest Marathi News)

Sharad pawar
lok sabha election 2024: 'शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवणार' अन् ४० जागा मविआ जिंकणार ठाकरे गटाचा दावा

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाने राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली. मागच्या काही दिवसात अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपुर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता बीआरएसमध्ये होणारे प्रवेश राज्यातील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्ष हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहेत.(Latest Marathi News)

Sharad pawar
Rahul Gandhi: विरोधी पक्ष एकवटलेत! निकालानंतर सगळ्यांनाच धक्का बसेल राहुल गांधींचे परदेशातून भाकीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.