Chhagan Bhujbal: 'शरद पवारांनी मला भेटायला बोलवलं तर मी…', छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ

पक्षातील काही आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी जात आहेत
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या त्यानंतर आता किती आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत यासाठी चुरस निर्माण झाली आहे. अशातच शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. तर अजित पवार यांना पाठिंबा देणारे आणि शरद पवार यांचे जवळचे नेते छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

या संपूर्ण घडामोडीवरती राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत. अशातच जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत. तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सर्व आमदार आमच्याच बाजूने आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Chhagan Bhujbal
Eknath Shinde rebel : शरद पवारांच्या पट्टशिष्याला शिंदेंच्या बंडाची कल्पना होती, सूरतला जाण्यासाठी केली मदत?

दोन-चार आमदार सोडले तर बाकी सर्व आमदार आमच्याच सोबत आहेत. कार्यकर्ते देखील आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळत आहे तुम्ही बघू शकता, असंही भुजबळ म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर काही आमदार हे सिल्वर ओकवर जात आहेत. या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, 'त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन. मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन', असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

तर पुढे छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, 'शरद पवार हे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.(Latest Marathi News)

Chhagan Bhujbal
Ajit Pawar Latest News : 'अजितदादांना सकाळी भेटले पण...',सुप्रिया सुळेंचं 'त्या' भेटीवर स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.