Devendra Fadanvis: CM शिंदेंना शह देण्यासाठीच फडणवीसांकडून शरद पवारांच्या नावाचा वापर; NCPच्या नेत्याचा दावा

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या दाव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावलं
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

२०१९ साली अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्याबरोबर बोलूनच सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. (Latest Marathi News)

फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. यानंतर चर्चांणा उधाण आलं आहे. यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर गोव्यातील राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.(Latest Marathi News)

क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमद्धे "श्री. एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीं मधील त्यांचे स्थान कमी केल्यामुळे श्री. देवेंद्र फडणवीस आत्ता स्वतः प्रसिद्धी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत, ते प्रसिद्धीसाठी आणि श्री.एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नावाचा दुरुपयोग काही मुलाखतीत करीत आहेत", असं त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
Pune Police: महिलांवरील हल्ल्याच्या घटनांनंतर पोलीस अ‍ॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय; आता...

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी म्हंटलं की, “उद्धव ठाकरें यांनी युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, राष्ट्रवादी भाजपाबरोबर येऊ शकते आणि ते स्थिर सरकार देऊ शकतात.”(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: आगामी निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार? फडणवीसांनी दिला पूर्णविराम; म्हणाले, “ती जागा…!”

त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, यासंबधीचा आराखडा तयार करण्यात आला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं बैठकीत ठरलं होतं. सर्व अधिकार आम्हाला दिले गेले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण, शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली, पण अजित पवार यांना ” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.(Latest Marathi News)

“पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. शरद पवार सोबत येतील म्हणून अजित पवार आणि मी शपथ घेतली पण पवार साहेब सोबत आले नाहीत त्यामुळे आमचं सरकार 72 तासात कोसळलं असं फडणवीस म्हणालेत.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
MNS: '...हे बाळासाहेबांना कदापि पटलं नसतं', भाजप-सेना काय भूमिका घेणार? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()