Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दवाखान्यातील बेडवरून भाजपवर केला हल्लाबोल! म्हणाले...

जखमी असतानाही धनंजय मुंडे पक्षासाठी मैदानात
Dhananjay Munde
Dhananjay MundeEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये त्यांना दुखापत झालेली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती लावता आली नाही. पण त्यांनी आज विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट प्रचाराचं भाषण केलं आहे.

येणाऱ्या काळात मराठवाड्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार असून दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. धनंजय मुंडे अपघातातून बरे झाले आहे. पण, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे आयोजित मेळाव्यात ऑनलाईन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.

Dhananjay Munde
Aadesh Bandekar: अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप; आदेश बांदेकर पोस्ट शेअर करत म्हणाले...

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या कृपेने मी अपघातातून बचावलो आहे. अशा पद्धतीने बेडवरून आपल्या सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधेल असे मी स्वप्नात ही पाहिले नाही' अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Dhananjay Munde
Accident News : रोडच्या कडेला असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले; चार जण ठार

पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार आणला आहे, हे फार दुर्दैवी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 7 पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्या सारखा उमेदवार मिळणार नाही. येणाऱ्या काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.