Ajit Pawar: अजितदादा भाजपमध्ये जाणार? एकनाथ खडसेंची म्हणाले, 'मी दादांसोबत बोललो…'

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे राज्यात या चर्चांना उधाण
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे राज्यात या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी मात्र आपण कुठेच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. दादा कुठेही जाणार नाहीत. त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. खडसे यांच्या या विधानाने अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Ajit Pawar
Maharashtra Politics: फडणवीस अन् अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा होणार का? शरद पवार म्हणाले...

एकनाथ खडसे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अजितदादा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी वारंवार या बातम्या दिल्या जातात, असं एकनाथ खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी बाबरी आंदोलनातील शिवसैनिकांच्या सहभागावरही भाष्य केलं.

Ajit Pawar
Supriya Sule: "... ते तर कोणीच सांगू शकत नाही", सुप्रिया सुळेंची अजित पवार प्रकरणावर मिश्किल प्रतिक्रिया

बाबरी आंदोलनात शिवसैनिक कमी संख्येने होते. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला असं म्हणण्याची हिंमत तेव्हा कोणी दाखवली नाही. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांकडे बोट दाखवणं योग्य नाही, असंही खडसे यांनी यावेळी म्हंटलं आहे.

बाबरी आंदोलनातील शिवसैनिकांच्या सहभागाबाबतचं चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. त्यांनी असे करायला नको होते. मी त्या ठिकाणी हजर होतो, तुरुंगातही होतो. शिवसेनेचा सहभाग कमी होता पण नव्हता असे नाही, असंही ते म्हणाले.

Ajit Pawar
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग आला असताना अजित पवार घेणार CM शिंदे अन् फडणवीसांची भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()