Jayant Patil : शरद पवार यांच्याबद्दल ‘तसं’ बोललोच नाही, जयंत पाटीलांची सारवासारव

जयंत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
 jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांची मोठी अडचण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्या भूमिकेवरही यानिमित्ताने शंका घेतली जात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे.

शरद पवार यांची खेळी हे असं बोललो नाही. ते गेस केलं होतं. जो घटनाक्रम बघितला होता आणि त्या घटनाक्रमाचा फायदा हे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणून बुजून केलं असं म्हणता येत नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

 jayant Patil
Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्या शपथविधीला ३ वर्ष पुर्ण झाले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

 jayant Patil
Prakash Ambedkar : "शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल"

यासंदर्भात जयंत पाटील यांनी नुकतचं भाष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांनी पुन्हा त्या वक्तव्यावर सारवा सारव केली आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()