'मुलं स्वतः जन्माला घालायची अन्..' सदाभाऊंचा मलिकांना टोला

Sadabhu Tweet viral : कोरोनाची तिसरी लाट (covid third wave) येणार का...यावरुन सध्या वेगवेगळ्या प्रकारची विधानं समोर येत आहेत.
सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Updated on

Sadabhu Tweet viral : कोरोनाची तिसरी लाट (covid third wave) येणार का...यावरुन सध्या वेगवेगळ्या प्रकारची विधानं समोर येत आहेत. तज्ञांनी देखील यावर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अशावेळी राजकीय वर्तुळातून देखील वेगवेगळया प्रकारची विधानं व्हायरल होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजपचं जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रियांना उधाण आले आहे. मलिकांच्या त्या विधानावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. त्यांनी शेलक्या शब्दांत मलिक यांच्यावर टीका केली आहे. त्यांचे व्टिट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media) झाले आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच (bjp) जबाबदार अशा प्रकारचं विधान मलिक (nawab malik) यांनी केलं होतं. त्यावर खोत यांनी त्यांना परखडपणे उत्तर दिलं आहे. त्यांनी केलेल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की, मलिक यांचे ते विधान म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची, नाव मात्र शेजाऱ्याचे लावायचे. खोत यांच्या त्या व्टिटला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चाही रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून खोत यांनी आघाडी सरकारला एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन कोंडीत पकडले होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून आघाडी सरकारच्या कामावर नाराजीही व्यक्त केली होती.

सदाभाऊ खोत
होय, पंतप्रधान मोदींची राष्ट्रवादीला ऑफर होती :नवाब मलिक;पाहा व्हिडिओ

दरम्यानच्या काळात मलिक यांचे पत्रकार परिषदेचे सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांच्यावर टीका केलीय. यावेळी त्यांनी एनसीबीनं गेल्या काही महिन्यात ज्या कारवाया केल्या आहेत त्या फर्जीवाडा असल्याचे सांगितले आहे. त्याचा पुरावा म्हणून मलिक यांनी याप्रसंगी काही फोन रेकॉर्डिंगही पत्रकारांना ऐकवले. येत्या दिवसांत आणखी काही नवे पुरावे सादर करुन एनसीबीनं केलेल्या फर्जीवाड्याची प्रकरणं उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मलिक नवीन काय आरोप करणार याकडे लक्ष लागले आहे.

सदाभाऊ खोत
शर्यतच नव्हे, खिलार वंश वाचला; सदाभाऊ खोत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.