सर्वजण आता जास्त शहाणे झालेत, देवानं त्यांना रातोरात अक्कल दिलीय; पटेलांचा बावनकुळेंवर घणाघात

शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा आहेत - चंद्रशेखर बावनकुळे
Praful Patel vs Chandrashekhar Bawankule
Praful Patel vs Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on
Summary

शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा आहेत - चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत शरद पवार (Sharad Pawar) यांनाही टोला लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आहे. यामुळं उद्धव ठाकरे त्यांच्याप्रमाणं विचार करायला लागले आहेत. या पक्षातील भोंदुबाबाच्या ताब्यात कोण आलं तर तो सुटत नाही, असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधलाय.

बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आक्रमक झाले आहेत. राज्यातल्या विविध जिल्ह्यांत बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनीही भाष्य केलंय. या सर्वांना (टीकाकरांना) देवानं रातोरात अक्कल दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

Praful Patel vs Chandrashekhar Bawankule
Tipu Sultan : टिपू सुलतानचा पुतळा का बसवायचा नाही? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपला चांगलंच सुनावलं

भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे शुक्रवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीनं जादुटोणा करुन जाळ्यात ओढलं, अशी टीका केली. तसंच शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदूबाबा आहेत, असंही त्यांनी म्हटलं. बावनकुळेंच्या या टीकेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केलीय. आज गोंदिया (Gondia) इथं प्रफुल्ल पटेल म्हणाले, कोणी अशा लहान गोष्टी करत असेल, तर आम्ही त्यावर काय भाष्य करणार? सर्वच जण आता जास्त शहाणे झालेत, देवानं सर्वांना रातोरात अक्कल दिलीय, असा टोमणा पटेलांनी बावनकुळेंना लगावलाय.

Praful Patel vs Chandrashekhar Bawankule
गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.