पुणे : सध्या राज्यात वाईन विक्रीच्या परवाना दिल्यावरुन चांगलेच राजकारण पेटल्याचे दिसत आहे. सर्व भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करित आहेत. विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही असे सांगितले. अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी घेतला आहे. (NCP Leader Rupali Patil Thombare Criticize Over Wine Politics On BJP)
अमृता फडणवीस यांनी शनिवारी महाविकास आघाडीवर टीका करताना खोचक ट्विट केले होते. या ट्विटनंतर रुपाली ठोंबरे यांनी देखील ट्विट केले आहे. "थोडक्यात उत्तर द्या ५0 गुण..शेतकऱ्यांना साले म्हणणारे, शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडवणारे, कर्मचाऱ्यांचे बँक अकाउंट हवे. त्या बँकेत वळवणारे या जमाती कुठे सापडतील? रिकाम्या जागा भरा ५० गुण
#MVA सत्तेत आल्यापासून सर्वात जास्त कुणाचा जीव तडफडतोय ...#सत्तापिपासू", असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर ही (BJP) टीका केली आहे.
सरकारकडून निर्णयाचे समर्थन
राज्य सरकारकडून वाईन विक्रीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले जात आहे. वाईन आणि दारु असा फरक प्रसारमाध्यमांना सांगितला जात आहे. भिडे गुरुजी यांनीही या वादात उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आता सरकार माॅल्स, दुकाने आदी ठिकाणी वाईन विक्रीची दिलेली परवानगी मागे घेणार का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.