Ramdas Kadam: 'रामदास कदमांच्या पराभवाच्या आदल्या रात्री कुत्री रडत होती', राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

राष्ट्रवादीच्या नेत्यानं रामदास कदम यांच्यावर टीका करताना मर्यादा ओलांडल्या
Ramdas Kadam
Ramdas KadamSakal
Updated on

ठाकरे गटाची खेडमध्ये सभा झाल्यापासून तेथील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणात शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली खेड मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खालच्या पातळीवर जाऊन शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. माजी आमदार संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांना बोबड्या दळभद्री अशी टीका केली आहे. संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी निवडून येण्यासाठी काय काय केले होते त्यावरून हल्लाबोल केला होता.

Ramdas Kadam
PM मोदींच्या बाजूनं कपिल सिब्बल लढणार; नेमकं काय आहे प्रकरण?

रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तीन भगत आणले होते अशी टीका केली होती. मात्र त्यावेळी ते 13 हजार मतांनी रामदास कदम पराभूत झाले होते. असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. संजय कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचा राजकीय इतिहास सांगितला आहे. वीर मतदान केंद्रावर रामदास कदम यांना गुहागर मतदार संघामध्ये ज्या वेळी निवडणूक झाली त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना केवळ 1 मत मिळाले होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

Ramdas Kadam
Congress: काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान दुर्घटना; अचानक कोसळलं स्टेज video Viral

गुहागर मतदारसंघात ज्यावेळी रामदास कदम यांचा पराभव झाला त्याच्या आदल्या दिवशी रामदास कदम यांच्या जामगे गावातील कुत्री रडत होती अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे. गुहागर मतदार संघातून रामदास कदम पराभूत झाले, त्यावेळी चिपळूण मतदार संघातून सदानंद चव्हाण शिवसेनेकडून विजयी झाले होते. विजयी झाल्यानंतर सदानंद चव्हाण मुंबईला रामदास कदम यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळी रामदास कदम यांचा गुहागर मतदारसंघातून पराभव झाल्यामुळे त्या पराभवाचे खापरदेखील सदानंद चव्हाण यांच्यावरतीच त्यांनी फोडले होते. अर्वाची भाषेत त्यांच्यासमोर ते बोलले होते असं सांगितल्यानंतर कोकणातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली खेड मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना 'चोऱ्या माऱ्या केलेले रामदास कदम, अडाणी रामदास कदम अशी टीका केली आहे. रामदास कदम यांची उंची साडेचार फूट, आणि त्यांच्या मुलाची उंची 6 फूट अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे.

Ramdas Kadam
१५ एप्रिलपर्यंत संपणार अंतिम सत्र परीक्षा! शाळांना २ मेपासून ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()