Sharad Pawar: "शरद पवारांचा अदानी प्रकरणात यु-टर्न, राष्ट्रवादी भाजपची बी टीम?"

शरद पवारांच्या भूमिकेने राजकारण तापलं! राष्ट्रवादी भाजपची बी टीम? मनसेचा खोचक टोला
Sharad Pawar
Sharad PawarEsaka
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरुन मोदी सरकारला धारेवर धरलं असतानाच शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्येच फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच प्रकरणावरुन मनसेनेही राष्ट्रवादीला डिवचत भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन आता मनसेकडूनही राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम पाहत आहे का? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. यासंबधी संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

संदीप देशपांडे यांचे ट्विट...

"अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजप नी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का? की दुसऱ्यांना भाजपची बी टीम आहे असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत ???, असं खोचक ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

Sharad Pawar
Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

दरम्यान, शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केलं आहे. "शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतली म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येफूट पडणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar: "शरद पवारांनी अभ्यास करून बोलावे"

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी केली होती. मात्र शरद पवारांनी मात्र या मागणीला विरोध दर्शवला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांनी एकप्रकारे गौतम अदाणी यांचं समर्थन केल्याचं दिसून येत आहे. पवार यांनी संयुक्त संसदीय समितीऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत अदानी प्रकरणी चौकशी करावी, असं विधान केलं होतं.

तसेच हिंडेबनर्ग रिपोर्टवरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केलं होतं. "त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं," असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता.

Sharad Pawar
राष्ट्रवादी-भाजपची जवळीक वाढली? आता पवारांवरील काँग्रेसच्या टीकेला फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.