गणपतराव देशमख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, म्हणाले...

गणपतराव देशमख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, म्हणाले...
Updated on

सांगोला : मला मंत्रिपद देऊ नका असा आग्रह धरणारे, महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील विविध प्रश्न व विशेषतः शेतीच्या पाण्याचा प्रश्नावर सतत चिंता व चिंतन करणारे गणपतराव एकमेव होते. गणपतरावांचे नेतृत्व फक्त सांगोल्यापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांचे नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले.

माजी आमदार व शेकापचे ज्येष्ठ नेते कै. गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज रविवार (ता. 8) रोजी सांगोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, नानासाहेब लिगाडे, चंद्रकांत देशमुख, कै. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, बळीराम साठे, शिवाजीराव काळूंगे, बाळासाहेब काटकर व देशमुख कटुंबीय उपस्थित होते.

गणपतराव देशमख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, म्हणाले...
महाराष्ट्रात गेलो की ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार - राणे

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कै. गणपतराव देशमुख यांच्याबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. शरद पवार म्हणाले की, गणपतराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ, चारित्र्यसंपन्न नेतृत्व मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्य होते. ते सतत सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल बोलत असत. माझ्या घरी जी वर्दळ नेहमी असायची त्यामध्ये शेकाप पक्षाच्या नेत्यांची संख्या जास्त होती. मंत्रिमंडळात शेकापच्या समावेशावेळी एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख यांचे नाव आले होते. परंतु गणपतराव देशमुख यांनी मला मंत्रिपद देऊ नका. रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्याला मंत्रिपद द्या असा आग्रह केला होता. परंतु गणपतरावांचा श्रमिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा अभ्यास यामुळे रोजगार हमी मंत्री त्यांनाच करण्याचा सर्वांच्या आग्रहामुळे त्यांना मंत्रीपद स्वीकारावे लागले.

गणपतराव देशमख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, म्हणाले...
प्रेयसी म्हणाली, जा मर; FB Live करत प्रियकराने संपवली जीवनयात्रा

आबांसारखे स्वच्छ, चारित्र्य संपन्न नेता मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्य होते. गणपतराव हे फक्त सांगोला पुढे ते मर्यादित नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे विशेषतः दुष्काळी भागातील कष्टकऱ्यांचे, सामान्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य, कष्टकरी, लोकांसाठी झटणारा माणुस हरपला. गणपतराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्त भागात केलेले काम हे फार महान असून ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.