NCP Meeting Live : राष्ट्रवादीचा प्रचारप्रमुखही ठरला; जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा

Sharad Pawar Group : राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडली यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
 jayant Patil
jayant Patilesakal
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रचार प्रमुखाची घोषणा केली. तसेच या प्रचार प्रमुखावर महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (NCP Meeting campaign chief oppointed Jayant Patal made a big announcement)

 jayant Patil
NCP Ajit Pawar: "आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जातं"; अजितदादांचं काकांवर टीकास्त्र

जयंत पाटील म्हणाले, "पवारसाहेबांच्या शब्दापलिकडे आम्ही जात नाही एवढीच आमची चूक आहे. आमच्या अमोल कोल्हेंची एक क्लीप बघितली. त्यात त्यांनी सांगितलं की बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यात सुख होऊन पहायचं असतं. आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या कष्टामुळं तयार झालेल्या आहेत हे मनात ठेवा काहीतरी"

 jayant Patil
Prafull Patel: विरोधीपक्षांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेलांचा हल्लाबोल; म्हणाले, मला हसू येत होतं...

"कोल्हेंच्या त्या क्लीपमध्येच उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरणं. माझा मोह आहे की पक्षात चर्चा केल्याशिवाय बरोबर नाही पण आता पक्षातील गर्दी थोडी कमी झालेली आहे. आता मला थोडा बहुत अधिकार आहे.

कोल्हेसाहेब (Amol Kolhe)तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा. सगळ्या महाराष्ट्रात फिरू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीराजांचा स्वाभिमाना महाराष्ट्रानं कसा जपलाय हे सांगायचं काम तुम्ही करा. संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांच्या बाजून उभा आहे," अशा शब्दांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्यावर सोपवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.